पुढारी ऑनलाईन डेस्क : अन्न पदार्थ, खनिज तेले, कच्चे पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, अन्न उत्पादने, वस्त्रे आणि रसायने तसेच रासायनिक उत्पादने यांच्या किंमतीत घट झाल्याने अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा वार्षिक दर डिसेंबर २०२१ च्या तुलनेत डिसेंबर २०२२ या महिन्यात ४.९५% इतका राहिला.नोव्हेंबर २०२२ मध्ये हा दर ५.८५% इतका नोंदवला गेला होता.सोमवारी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली.
डिसेंबर २०२२ या महिन्यासाठीच्या घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांकात नोव्हेंबर २०२२ मधील दरांच्या तुलनेत मासिक स्तरावर उणे १.१२% इतका नोंदवण्यात आला.खाद्य पदार्थांखेरीज इतर वस्तुंच्या किंमतींमध्ये नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये १.१९% आणि खनिजांच्या किंमतीमध्ये १.०२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर, नोव्हेंबर २०२२ मधील दरांच्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये खाद्यपदार्थ ३.१६% आणि कच्चे पेट्रोलियम तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या किंमतीत १०.८१ टक्क्यांची घट झाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
नोव्हेंबर च्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये विजेच्या किमती ९.५१ टक्क्यांनी वाढल्या. तर, याचकाळात खनिज तेलांच्या किमती ४.६४% कमी झाल्या.खाद्य निर्देशांक १७३ वरून डिसेंबर, २०२२ मध्ये १७०.३ वर घसरला. घाऊक किमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर २.१७% वरून डिसेंबर २०२२ मध्ये ०.६५% पर्यंत कमी झाल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे.
हेही वाचलंत का ?