मोठा दिलासा - Wholesale Price Index : घाऊक महागाईचा दर २१ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर
घाऊक महागाईचा दर २१ महिन्यांत निच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील घाऊक किंमत दर (WPI) गेल्या २१ महिन्यांत पहिल्यांदाच ५.८५ टक्के इतका कमी आला आहे. वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर ८.३९ टक्के तर नोव्हेंबर २०२१मध्ये हा दर १४.८७ टक्के इतका होता. म्हणजेच गेल्या दोन महिन्यांशी तुलना करता घाऊक महागाईचा दर ४७० बेसिक पॉईंटनी कमी आला आहे. (Wholesale Price Index)
दोन दिवसांपूर्वी सांख्यकी मंत्रालयाने ग्राहक किंमत निर्देशांक प्रसिद्ध केला होता. यानुसार नोव्हेंबरमध्ये महागाईचा निर्देशांक ५.८८ टक्के इतका कमी नोंदवला गेला. ऑक्टोबर महिन्यात हा निर्देशांक ८.३९ टक्के इतका होता. घाऊक महागाईचा नोव्हेंबर २०२१मधील दर १४.८७ टक्के इतका जास्त होता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर महागाईचा दर २ ते ६ टक्के यांच्यामध्ये ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे महागाई वरच्या पातळीची जी मर्यादेच्या आत आलेली आहे. २०२१नंतर पहिल्यांदाच घाऊक महागाई, ही ग्राहक किंमत निर्देशांकापेक्षा कमी राहिलेली आहे.
The annual rate of inflation based on WPI has declined from 8.39 % in October 2022 to 5.85 % in November 2022.
The annual inflation rate of the Primary Articles group of WPI has declined from 11.04 % in October 2022 to 5.52 % in November 2022.#WPI@CimGOI @PiyushGoyal— DPIIT India (@DPIITGoI) December 14, 2022
खाद्यान्नांची महागाई २.१७ टक्के राहिली आहे. हा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात ६.४८ टक्के इतका होता. मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टचा महागाईचा निर्देशांकही ३.५९ टक्के इतका कमी आला आहे. इंधन आणि ऊर्जा महागाई निर्देशांकही १७.३५ टक्के इतका खाली आला आहे. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाई दर ८.३९ टक्के इतका एक आकडी होता. याआधीच्या १८ महिन्यात घाऊक महागाई दर सतत दोन आकडी राहिला होता.
पुढील वर्षी ६ आणि ८ फेब्रुवारीला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होत आहे. या बैठकीत पुन्हा एकदा व्याजदार वाढवले जाण्याचे संकेत आहेत. पण आता महागाई ६ टक्केपेक्षा खाली आलेली असल्याने पतधोरण समिती कोणता निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा