Stock market Today | किरकोळ महागाई दर कमी झाल्याने शेअर बाजारात तेजी | पुढारी

Stock market Today | किरकोळ महागाई दर कमी झाल्याने शेअर बाजारात तेजी

Stock market Today : जागतिक सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत किरकोळ महागाईचा (retail inflation) दर कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि.१३) शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी वाढून ६२,२०० वर गेला. तर निफ्टी १८,५०० वर पोहोचला. नोव्हेंबरमधील देशांतर्गत किरकोळ महागाई दर आरबीआयच्या मर्यादेपेक्षा कमी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. परिणामी, शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकांनी तेजीत सुरुवात केली.

आशियाई बाजारात संमिश्र वातावरण आहे. आशियाई बाजारातील सुरुवातीच्या व्यवहारात जपानचा निक्केई ०.३१ टक्क्यांनी आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.०३ टक्क्यांनी वाढला. तर चीनचा शांघाय कंपोझिट ०.२१ टक्क्यांनी घसरला.

अन्नधान्यांच्या किमतीत कमी वाढ झाल्याने देशातील वार्षिक किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये ५.८८ टक्क्यांपर्यंत आला, जो ऑक्टोबरमध्ये ६.७७ टक्के होता. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ६.४० टक्के राहील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता. (Stock market Today)

हे ही वाचा :

Back to top button