भ्रष्टाचार प्रकरणांचा तपासासाठी माजी कर्मचाऱ्यांची नेमणूक नको : केंद्रीय दक्षता आयोग | पुढारी

भ्रष्टाचार प्रकरणांचा तपासासाठी माजी कर्मचाऱ्यांची नेमणूक नको : केंद्रीय दक्षता आयोग

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी माजी कर्मचाऱ्यांची नेमणूक नको, असे निर्देश केंद्रीय दक्षता आयोगाने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या तसेच सरकारी खात्यांना दिले आहेत.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी माजी कर्मचारी नेमले जाऊ नयेत, असे आदेश दोन दशकांआधी काढण्यात आले होते. तथापि काही संस्थांमध्ये तपासासाठी माजी कर्मचारी नेमले जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हे निर्देश दिले जात असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. वरील निर्देशांचे काटेकोरपणे पालन होण्याची अपेक्षा असल्याचेही आदेशात म्हटले आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकारणांचा तपास करण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमला जावा, असे दक्षता आयोगाने ऑगस्ट 2000 मध्ये स्पष्ट केले होते.

 हेही वाचा :

 

 

 

Back to top button