खराब हवामान, धुक्यामुळे राजधानी दिल्लीतील विमानसेवा विस्कळीत | पुढारी

खराब हवामान, धुक्यामुळे राजधानी दिल्लीतील विमानसेवा विस्कळीत

पुढारी ऑनलाईन : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे दिल्ली पंजाब, हरियाणा या भागात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली असून, यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम विमान सेवेवरही झाला आहे. वाढती थंडी, खराब हवामान आणि धुक्यामुळे राजधानी दिल्लीतील विमानसेवा विस्कळीत झाली आहे.

खराब हवामान, धुके आणि इतर संबंधित समस्यांमुळे देशांतर्गत फेऱ्या करणाऱ्या ११८ विमानांना याचा सामना करावा लागला आहे. त्यांचे नियमित वेळापत्रक कोसळले असून, त्यांना टेक ऑफ आणि लँडिंगसाठी उशिर झाला आहे. वाढती थंडी, खराब हवामान आणि धुके यामुळे परदेशातून भारतात येणाऱ्या सुमारे ३२ विमांनांना लँडिंगसाठी उशिर लागला.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कमी दृश्यमानतेमुळे शारजाहून दिल्लीला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे एक विमान जयपूरकडे वळवण्यात आले. अशाप्रकारे 3 उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आली आहेत. सध्याच्या हवामानामुळे सुमारे १५ विमान उड्डाणे उशीरा झाली आहेत, अशी माहिती दिल्ली विमानतळ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा:

Back to top button