जोशीमठच्‍या पुनर्वसनासाठी ४५ कोटींचे पॅकेज : उत्तराखंडच्या मुख्‍यमंत्र्यांची घोषणा | पुढारी

जोशीमठच्‍या पुनर्वसनासाठी ४५ कोटींचे पॅकेज : उत्तराखंडच्या मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नैसर्गिकाच्‍या प्रकोपाचा सामना करणार्‍या जोशीमठ मधील पनर्वसनसाठी ४५ कोटींचे पॅकेज आज मुख्‍यमंत्री पुष्‍कर सिंह धामी यांनी जाहीर केले. ही आर्थिक मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्‍या तीन हजार कुटुंबाना देण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी माध्‍यमाशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

मुख्‍यमंत्री धामी यांनी आज जोशीमठला भेट दिली. यानंतर माध्‍यमांशी बोलताना ते म्‍हणाले, ” सध्‍या आपत्तीग्रस्‍त प्रत्‍येक कुटुंबाला दीड लाख रुपयांची मदत केली जात आहे. बाधित जमीन मालकांना किंवा कुटुंबांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत यापूर्वीच केली आहे. तसेच राज्‍यातील आपत्ती प्राधिकरणाकडून प्रत्येक कुटुंबाला सामानाची वाहतुकीसाठी ५०,००० रुपये विशेष अनुदान देण्यात आल्याचेही त्‍यांनी सांगितले.

उत्तराखंडमधील जोशीमठ शहर परिसरात भूस्खलन झाल्यामुळे ७२० हून अधिक इमारतींना तडे गेले आहेत. पुनर्वसनाचा एक भाग म्हणून बाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. संबंधित अधिकार्‍यांनी राज्‍यातील बांधकाम प्रकल्प थांबवले आहेत. सरकारने नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button