Vivah Muhurat 2023 : दोन दिवसांनंतर सुरू होणार लग्नाची धामधूम; जाणून घ्या नवीन वर्षातील लग्न मुहूर्त | पुढारी

Vivah Muhurat 2023 : दोन दिवसांनंतर सुरू होणार लग्नाची धामधूम; जाणून घ्या नवीन वर्षातील लग्न मुहूर्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्न म्हटलं की, वधूवरांच्या वेशभूषेपासून ते लग्नाला येणाऱ्या पै पाहुण्यांपर्यत सर्वच ठिकाणी घाईगडबड, नवचैतन्य आणि उत्साह पाहायला मिळतोय. लग्नाला प्रत्येकाच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक जण इतरांपेक्षा कसे वेगळे दिसावे किंवा असावे यासाठी प्रयत्नात असतोच. लग्नाची धामधूम कोणाचाही घरात सुरू झाली की, वावावरण प्रसन्न होवून याते. जे लग्नाळू इच्छूक आहेत त्यांच्यासाठी या वर्षी ५९ शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे यावर्षी कोणते शुभ मुहूर्त कोणकोणत्या महिन्यात आहेत ते पाहूयात… (Vivah Muhurat 2023)

येत्या दोन दिवसांनंतर सुर्य मकर राशीत प्रवेश करणार असल्याने लग्नाळूसाठी शुभ मुहूर्त सुरू होणार आहेत. यावर्षी (२०२३) लग्नाचे १२ महिन्यात एकूण ५९ शुभ मुहूर्त आहेत. अशा परिस्थितीत लग्नाळूंसाठी हे दिवस चांगले असून या मुहूर्तावर लग्न करू शकतात.

यावर्षीच्या जानेवारी महिन्यात लग्नाचे एकूण ४ शुभ मुहूर्त आहेत. तर एप्रिल जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये विवाह मुहूर्त नाहीत, कारण भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून चार महिने योग निद्रेमध्ये जातात. अशा स्थितीत सर्व शुभ कार्ये थांबविली जातात. दुसरीकडे, देवतानी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या योग निद्रा यज्ञासह विवाहाच्या शुभ कार्यांना पुन्हा सुरुवात होते. म्हणून यातील एका मुहूर्तावर लवकरात -लवकर लग्न उरकून घ्या. (Vivah Muhurat 2023)

यावर्षीचे शुभ मुहूर्त

जानेवारी

१८, २६, २७ आणि ३१ जानेवारी

फेब्रुवारी

६, ७, १०, ११, १४, १६, २२, २३, २४, २७ आणि २८ फेब्रुवारी

मार्च

८, ९, १३, १७ आणि १८ मार्च

मे
२, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९ आणि ३० मे

जून

१, ३, ७, ८, ११, १२,१३,१४, २३, २६, २७ आणि २८ जून

नोव्हेबर

२७, २८ आणि २९ नोव्हेबर

डिसेंबर

६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६ आणि ३१ डिसेंबर

या महिन्यात नाहीत विवाहाचे शुभ मुहूर्त

एप्रिल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या पाच महिन्यांत विवाहाचे मुहूर्त नाहीत.

(वरील माहितीशी पुढारी ऑनलाईनचा काहीही संबध नाही)

हेही वाचलंत का? 

Back to top button