Youtube Channels Ban: 20 लाखांहून अधिक सब्सक्राइबर असलेल्या ‘या’ 6 यूट्यूब चॅनलवर बंदी, केंद्राची कारवाई | पुढारी

Youtube Channels Ban: 20 लाखांहून अधिक सब्सक्राइबर असलेल्या ‘या’ 6 यूट्यूब चॅनलवर बंदी, केंद्राची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : Youtube Channels Ban : केंद्र सरकारने 6 यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली असून या यूट्यूब चॅनेलवरून फेक न्यूज पसरवल्या जात असल्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) फॅक्ट चेकमध्ये समोर आले आहे. या सहा चॅनेलचे 20 लाखांहून अधिक सब्सक्राइबर होते.

बंदी घालण्यात आलेली सहा यूट्यूब चॅनेल पुढील प्रमाणे आहेत

1. राष्ट्रीय टीव्ही : सब्सक्राइबर 5.57 लाख
2. संवाद टीव्ही : सब्सक्राइबर 10.9 लाख
3. सरोकार भारत : सब्सक्राइबर 21.1 हजार
4. राष्ट्र 24 : सब्सक्राइबर 25.4 हजार
5. स्वर्णिम भारत : सब्सक्राइबर 6.07 हजार
6. संवाद समाचार : सब्सक्राइबर 3.84 लाख

या सर्व चॅनेलच्या एकूण सब्सक्राइबरची संख्या 20.47 लाख होते. तर व्हिडिओच्या व्ह्यूजची संख्या 51 कोटींहून अधिक होते.

Back to top button