उत्तर भारतात तापमान उणे ४ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरण्याचा इशारा | पुढारी

उत्तर भारतात तापमान उणे ४ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरण्याचा इशारा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातील थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हिमालय पर्वतरांगात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे काही ठिकाणी तापमान उणे चार अंश सेल्सियसपर्यंत खाली येउ शकते, असे हवामान क्षेत्रातील तज्ज्ञ नवदीप दहिया यांनी सांगितले.

१४ ते १९ जानेवारी दरम्यान दिल्ली, उत्तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या ठिकाणी बोचरी थंडी राहू शकते. थंडीबरोबरच धुक्याचा प्रकोप पुढील काही काळ कायम राहणार आहे. विशेषतः १३ ते १७ जानेवारी या कालावधीत दिवसा आणि रात्री उत्तर प्रदेश, प. बंगाल, सिक्कीम, ओडिशा, आसाम, मेघालय, त्रिपुरा या राज्यांत धुके जास्त राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा :

Back to top button