Ashneer Grover : अशनीर ग्रोव्हर यांची घोषणा! मर्सिडीज कारचे करणार वाटप; जाणून घ्या याबाबत सविस्तर | पुढारी

Ashneer Grover : अशनीर ग्रोव्हर यांची घोषणा! मर्सिडीज कारचे करणार वाटप; जाणून घ्या याबाबत सविस्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : कार चाहत्यांपैकी अनेकजणांचे मर्सडीज घेण्याचे स्वप्न असते. एखाद्या लॉटरी तिकिटावर किंवा बक्षिस म्हणून कार मिळाल्यानंतरचा आनंद हा खूप वेगळा असतो. सोशल मीडियावर सध्या मर्सडिज वाटपाबाबतचा एक विषय ट्रेंडींगवर राहिला आहे. BharatPe चे सह-संस्थापक अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अशनीर यांनी मर्सडीज कार वाटप करणार असल्याबाबतची लिंक्डइनवर पोस्ट केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे सध्या मर्सडिज वाटपाबाबतची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अशनीर यांचे मर्सडीज कार वाटप कधी आणि कोणाला वाटप करणार आहेत, पाहुयात याविषयी सविस्तर माहिती.

थर्ड युनिकॉर्न (Third Unicorn) ही अशनीर ग्रोव्हर यांची नवी कंपनी आहे. त्यांच्या या नव्या कंपनीच्या स्थापनेनंतर त्यांनी मर्सडिज कार वाटप करणार असल्याची ही मोठी माहिती आहे. भारतात एखाद्या कंपनीत ५ वर्षे काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी मिळते. अशनीर (Ashneer Grover) यांनी त्यांच्या थर्ड युनिकॉर्न (Third Unicorn) या नव्या कंपनीमध्ये सलग 5 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मर्सिडीज कार देण्याची घोषणा केली आहे. अशनीर यांनी लिंक्डइनवर याबाबतची माहिती देणारी पोस्ट केली आहे. हि माहिती देत असताना ते म्हणाले की, ग्रॅच्युइटी म्हणून मिळणारी रक्कम खूपच कमी असते, रात्रंदिवस कंपनीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा हा एक प्रकारे अपमान आहे. त्यामुळेच मी आता या कर्मचाऱ्यांसाठी एक नवी सुविधा आणली आहे.

अशनीर ग्रोव्हर यांनी १० जानेवारीपासून त्यांच्या नवीन स्टार्टअपच्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या एका लिंक्डइन पोस्टमध्ये, गुंतवणूकदारांना स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित देखील केले आहे.

मार्केटमध्ये मोठी हालचाल घडवून आणणार

अशनीर ग्रोव्हर यांनी त्यांच्या लिंक्डइन प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ”२०२३ मध्ये काहीतरी वेगळे करु, आम्ही थर्ड युनिकॉर्न कंपनीच्या माध्यमातून मार्केटमध्ये मोठी हालचाल निर्माण करुन व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणार आहोत. आत्तापर्यंत कोणत्याही बाह्य गुंतवणूकदाराचा पैसा या कंपनीमध्ये गुंतवला गेला नाही. त्याचबरोबर ही कंपनी प्रसिद्धीपासून देखील दूर आहे. त्यामुळे आम्ही आता काहीतरी वेगळे करु इच्छित आहोत. अशा आशयाची त्यांची ही पोस्ट आहे. त्यांच्या या नव्या पॉलिसीमुळे थर्ड युनिकॉर्न ही कंपनी मार्केटमध्ये व्यवसायाचे पाय रोऊन उभी राहिली आहे.

हेही वाचा

Back to top button