BBC Documentary Controversy : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची हीच खरी वेळ : अमेरिका परराष्ट्र मंत्रालय | पुढारी

BBC Documentary Controversy : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची हीच खरी वेळ : अमेरिका परराष्ट्र मंत्रालय

पुढारी ऑनलाईन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगल यांच्यावरील बीबीसीच्‍या  वादग्रस्‍त डॉक्युमेंट्रीवर भारताने बंदी घालणे, हा माध्यम स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीतील तत्वांविरोधात आहे. त्यामुळे या तत्वांचे महत्त्व अधोरेखित करण्याची हीच खरी वेळ असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्‍हटलं आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ता नेड प्राअस यांनी सांगितले की, “अमेरिका जगभरातील मुक्त प्रेसचे समर्थन करतो. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या लोकशाही तत्वांना अधोरेखित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अमेरिका जगभरातील मुक्त प्रेसच्या महत्त्वाचे समर्थन करतो.”

अमेरिका मानवाधिकाराच्या रूपात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म, आणि विश्वासाचे स्वातंत्र्य यासारख्या लोकशाही तत्त्वांचे महत्त्व अधोरेखित करत आला आहे. यामुळे लोकशाही आणखी मजबूत होत राहिल. भारतासोबतच्या संबंधांमध्येही हा मुद्दा मुद्दा निश्चित समोर असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

यापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस यांनी म्हटले होते की, “अमेरिका आणि भारत या दोन्ही संपन्न आणि लोकशाही देशांमध्ये सामायिक मूल्यांची मला माहिती आहे. अमेरिकेचे भारतासोबत असलेले द्विपक्षीय संबंध मजबूत आहेत.”

हेही वाचा :

Back to top button