BBC Documentary Controversy : पंतप्रधानांवरील डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगकरीता जेएनयूएत वाटली पत्रके | पुढारी

BBC Documentary Controversy : पंतप्रधानांवरील डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगकरीता जेएनयूएत वाटली पत्रके

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील नामांकित जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉरर्पोरेशने (बीबीसी) बनवलेली विवादास्पद डॉक्युमेंट्री दाखवण्यासाठी विद्यापीठात (BBC Documentary Controversy) पत्रक वाटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ दिशानिर्देश जारी करीत अशा प्रकारच्या कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला आहे.

जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा आयशी घोष यांनी वादास्पद डॉक्युमेंट्रीचे पोस्टर शेअर (BBC Documentary Controversy) केले आहे. या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंग करीता ‘आमच्या सोबत सहभागी व्हा’ असा मजकूर या पोस्टरवर लिहिला आहे. यानंतर प्रशासनाने याबाबद तत्काळ निर्देश जारी केले आहेत. असे कार्यक्रम विद्यापीठातील शांतता भंग करू शकतात. विद्यार्थ्यांनी असे कार्यक्रम घेवू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात शेड्युल बनवले आहे, त्यांनी ते तत्काळ रद्द करावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

हैद्राबाद विद्यापीठामध्ये बीबीसीच्या या डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग करण्यात आले. याप्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे. बीबीसी डॉक्युमेंट्री ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’चे यूट्युब व्हिडिओ लिंक ब्लॉक करण्याचे आदेश केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. आयटी नियम, २०२१ नुसार आपत्कालीन अधिकारांचा वापर करीत हे निर्देश देण्यात आले होते. निष्पक्षतेचा अभाव असलेला तसेच वसाहतवादाचा मानसिकतेला दर्शवणारा हे एक प्रचारतंत्र असल्याचे मत केंद्र सरकारने यांसदर्भात व्यक्त केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button