कर्नल पुरोहित यांची बाजू मांडलेल्या ॲड. नीला गोखले यांची न्यायमूर्तीपदासाठी शिफारस | पुढारी

कर्नल पुरोहित यांची बाजू मांडलेल्या ॲड. नीला गोखले यांची न्यायमूर्तीपदासाठी शिफारस

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांची कोर्टात बाजू मांडलेल्या वकील नीला गोखले (Neela Gokhale) यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने केली आहे.

सात न्यायिक अधिकारी तसेच दोन वकिलांना विविध न्यायालयांमध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील कॉलिजियमने केंद्र सरकारला केली आहे. न्यायमूर्ती पदासाठी शिफारस करण्यात आलेल्या दोन वकिलांत नीला गोखले (Neela Gokhale) यांचा समावेश आहे. गोखले यांनी अनेक महत्वपूर्ण प्रकरणांत पक्षकारांची बाजू मांडलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सध्या 65 न्यायमूर्ती कार्यरत आहेत. दुसरीकडे या न्यायालयातील मंजूर न्यायमूर्तींची संख्या 94 इतकी आहे. कॉलिजियमने कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ॲड. नागेंद्र नाईक यांच्या नावाची शिफारस केली आहे. महत्वाचे म्हणजे याआधी दोनदा केंद्र सरकारने नाईक यांच्या नावाला आक्षेप घेत त्यांची फाईल परत पाठवली होती. आता तिसऱ्यांदा नाईक यांच्या नावाची शिफारस कॉलिजियमने केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button