Stock Market Today | गुंतवणूकदारांची सावध भूमिका, सेन्सेक्स, निफ्टीत चढ-उतार | पुढारी

Stock Market Today | गुंतवणूकदारांची सावध भूमिका, सेन्सेक्स, निफ्टीत चढ-उतार

Stock Market Today : जागतिक बाजारातून संकेरात्मक संकेत आहेत. असे असताना भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे आज बुधवारी (दि.११) सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी आला होता. त्यानंतर त्याने लगेच स्थिर पातळीवर येऊन तेजीच्या दिशेने वाटचाल केली. सकाळी १०.४० वाजता सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ६०,२९४ वर तर निफ्टी १८ हजारांजवळ व्यवहार केला. दरम्यान, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढ-उतार सुरु होता. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात आयटी शेअर्स आघाडीवर होते.

मागील सत्रात आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली होती. पण आता आयटी शेअर्संनी तोटा मागे टाकत आघाडी घेतली आहे. आयटीमध्ये कोफोर्ज, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, इन्फोसिस हे टॉप गेनर्स होते.

अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी त्यांच्या भाषणात व्याजदर धोरणावर भाष्य करणे टाळले. यामुळे अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक ‍वधारले. नॅस्डॅक निर्देशांक १ टक्क्याने वाढला. तर S&P 500 हा निर्देशांक ०.७० अंकांनी आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ०.५६ टक्क्याने वाढला. दरम्यान, आशियाई शेअर बाजारतही तेजीचे वातावरण आहे. बुधवारी तेलाच्या किमती घसरल्या होत्या. (Stock Market Today)

 हे ही वाचा :

Back to top button