पुढारी ऑनलाईन डेस्क : वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी समाजवादी पार्टीच्या ट्विटर ॲडमिनला लखनौ पोलिसांनी आज ( दि. ८) अटक केली. या कारवाईची दखल घेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट पोलीस मुख्यालयात धडक दिली. एकीकडे लखनौ पोलीस मुख्यालयाबाहेर सपाचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे ट्विटर ॲडमिनला झालेल्या अटकेच्या कारवाईवर अखिलेश यादव यांनी पोलिसांवर प्रश्नांची फैरी झाडली. ( Akhilesh In UP Police HQ )
समाजवादी पार्टीच्या ट्विटर ॲडमिन मनीष जगन अग्रवाल यांना लखनौ पोलिसांनी अटक केली. ट्विटरवर वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी अग्रवाल यांच्याविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी जाहीर केली. या कारवाईची माहिती मिळताच सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कार्यकर्त्यांसह लखनौ पोलीस मुख्यालयात धडक दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपसह उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी केली. तसेच अग्रवाल यांच्या सुटकेची आग्रही मागणीही केली.
यावेळी लखनौ पोलिसांनी अखिलेश यादव यांना चहा दिला. यावेळी अखिलेश यांनी चहा घेण्यास नकार दिला. ते म्हणाले " आम्ही येथे चहा पिणार नाही. आम्ही आमचा चहा स्वत: आणू, मात्र कप तुमचा घेवू. आम्ही येथे चहा पिवू शकत नाही. तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही लोकांनी चहात विष मिसळले असेल तर, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. अग्रवाल यांना केलेली अटक ही अत्यंत निदंनीय घटना आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :