Xiaomi 13 Pro : शाओमीचा 'लेटेस्ट कॅमेरा तंत्रज्ञान असलेला' 13 PRO स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच | पुढारी

Xiaomi 13 Pro : शाओमीचा 'लेटेस्ट कॅमेरा तंत्रज्ञान असलेला' 13 PRO स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच

पुढारी ऑनलाईन: स्मार्टफोन ब्रँड कंपनी Xiaomi लवकरच आपला नवीन फ्लॅगशिप फोन Xiaomi 13 Pro हा भारतात लाँच करत आहे. लीक्सनुसार २०२३ च्या पहिल्या तिमाहीत हा नवीन स्मार्टफोन लाँच होणार असल्याचे कंपनीने सांगितल्याचे म्हटले आहे. Xiaomi 13 ची मालिका नुकतीच डिसेंबर २०२२ मध्ये देशांतर्गत बाजारात लाँच करण्यात आली आहे. आता Xiaomi 13 Pro हा स्मार्टफोन जागतिक स्तरावर लाँच करण्यात येणार आहे.

शाओमीचा उत्तम कॅमेरा कवॉलिटी असलेला Xiaomi 13 Pro हा स्मार्टफोन लवकरच म्हणजे मार्च २०२३ पूर्वी भारतात लाँच केला जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच शाओमीने भारतात Redmi Note 12 ही सिरीज लाँच केली आहे.
आपल्या नवीनतम फ्लॅगशिप फोनच्या जागतिक लॉन्च पूर्वीच कंपनीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2023 साठी Leica सोबत भागीदारी केली आहे. Xiaomi 12S सीरीजचा कॅमेरा ट्यून करण्यासाठी कंपनीने गेल्या वर्षी Leica सोबत हातमिळवणी केली होती. भागीदारी पुढे Xiaomi 13 मालिकेपर्यंत वाढवण्यात आली, ज्यात Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro स्मार्टफोनचा समावेश आहे. म्हणजेच Xiaomi च्या नवीन सीरिजमध्ये उत्तम कॅमेरा सपोर्ट दिला जाईल.

कंपनीने नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro ला Xiaomi 12 Pro चा उत्तराधिकारी म्हणून भारतात लाँच करण्यास सांगितले आहे. टिपस्टर योगेश ब्रार यांच्या मते, कंपनी हा फोन भारतात मार्चपर्यंत लॉन्च करू शकते. मात्र, कंपनीने अधिकृतपणे फोनच्या लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. रिपोर्टनुसार, असेही म्हटले जात आहे की Xiaomi कडे MWC 2023 साठी काही मोठ्या योजना आहेत. या इव्हेंटमध्ये, कंपनी काही नाविन्यपूर्ण कॅमेरा तंत्रज्ञान देखील उघड करू शकते, ज्यावर ती Leica सोबत काम करत आहे.

हेही वाचा:

Back to top button