Electronics Show : आनंदी भावना व्यक्त करणारी कार आणि बरचं काही…’कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो मधील नवी आकर्षणे

Electronics Show : आनंदी भावना व्यक्त करणारी कार आणि बरचं काही…’कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो मधील नवी आकर्षणे
Published on
Updated on

Electronics Show : अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे, उपकरणांचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन म्हणजे आंतरराष्ट्रीय 'कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो' (सीईएस-2023) सध्या अमेरिकेच्या लास वेगास शहरात सुरू झालेला आहे. यामध्ये जगभरातील 174 देशांमधील 3200 पेक्षाही अधिक कंपन्या आपापल्या नव्या उपकरणांचे प्रदर्शन करीत आहेत. त्यापैकी 35 टक्के कंपन्या एकट्या अमेरिकेच्याच आहेत. 'सीईएस-2023' मध्ये नव्या तंत्रज्ञानाचे दर्शन होत आहे. तेथील नवे गॅझेटस् व डिव्हाईस लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामधील काही गॅझेटस्, कार व अन्य उपकरणांची ही माहिती…

Electronics Show : रिंग कार कॅम:

हा एक ड्युअल फेसिंग एचडी कॅमेरा आहे. त्याला व्हॉईस कमांड दिली जाऊ शकते तसेच रेकॉर्ड ड्रायव्हिंगची सुविधाही आहे. ते सहजपणे प्लग इन आणि इन्स्टॉल करता येऊ शकते. त्याच्या सहाय्याने यूजर कारच्या आत आणि बाहेरही पाहू शकतो. या कॅमेर्‍याच्या सहाय्याने वेळीच सावध होता येऊ शकते.

ऑप्टिमस प्राईम ट्रान्स्फॉर्मर  Electronics Show

हा जगातील पहिला ऑटो कन्व्हर्टिंग ट्रान्स्फॉर्मर आहे. तो अ‍ॅप आणि आवाजानेही कंट्रोल करता येऊ शकतो. त्यासाठी 39 व्हॉईस कमांडस् आहेत. या ट्रान्स्फॉर्मरला हॅस्ब्रोकडून लायसन्स मिळालेले आहे.

कलर-चेंजिंग कॉन्सेप्ट कार

बीएमडब्ल्यूने ही नवी रंग बदलणारी कन्सेप्ट कार शोमध्ये सादर केली आहे. ती केवळ एका सेकंदामध्येच आपला रंग बदलू शकते. मेटाव्हर्सच्या माध्यमातून ही कार आनंदासारख्या भावनाही व्यक्त करू शकते. विशेष म्हणजे ही कार व्हर्च्युअल असिस्टन्सच्या मदतीने चालकाशी बातचितही करू शकते. या कारच्या विंडशील्डवर ड्रायव्हिंग डेटा पाहता येतो तसेच कारमध्ये ऑटोमेशन फिचरही आहे.

वायरलेस टी.व्ही. Electronics Show 

आता टी.व्ही.ही चक्क 'वायरलेस' बनला आहे. 'डिसप्लेस'च्या या 'ट्रूली वायरलेस टी.व्ही'मध्ये स्वेपेबल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा फूल चार्ज केल्यावर जवळजवळ संपूर्ण दिवसभर टी.व्ही. सुरू राहू शकतो. या टी.व्ही.च्या वरच्या बाजूला लावलेल्या कॅमेर्‍याच्या सहाय्याने केवळ हाताच्या हालचालींनी टी.व्ही. चालवता येऊ शकतो. त्यामुळे या वायरलेस टी.व्ही.बरोबर रिमोट दिला जात नाही. या 55 इंची वायरलेस टी.व्ही.ची किंमत 2 लाख 48 हजार रुपये आहे!

Electronics Show : सर्वात पातळ गेमिंग लॅपटॉप 

एलेनवेयरने जगातील सर्वात कमी जाडीचा चौदा इंची गेमिंग लॅपटॉप या प्रदर्शनामध्ये सादर केला आहे. चांगले कुलिंग आणि कन्फर्टसाठी लॅपटॉपमध्ये नवे फूट डिझाईन आहे. या लॅपटॉपमध्ये 2560 बाय 1600 पिक्सेल डिस्प्ले आणि 165 हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला आहे. ऑडियो-व्हिडीओ एक्सपिरियन्ससाठी डॉल्बी एटमॉस आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टही आहे. हिट कंट्रोल करण्यासाठी सीपीयू व जीपीयू थर्मल मटेरियलपासून बनवलेले आहे.

Electronics Show : फोल्डेबल ओएलईडी स्क्रीन

सॅमसंग कंपनीने घडी करता येणारे स्क्रिन्स विकसित केले असून त्याचे 'सीईएस 2023' मध्ये प्रदर्शन करण्यात आले. 'फ्लेक्स हायब्रीड ओएलईडी मोबाईल स्क्रीन'कडे लोकांचे लक्ष वेधले गेले. हा स्क्रीन 10.5 इंच 4ः3 डिस्प्लेमध्ये फोल्ड करता येतो. यामधील 'ओएलईडी' डिस्प्ले टेक्नॉलॉजी उत्कृष्ट इमेज क्वॉलिटी प्रदान करते.

इलेक्ट्रिक स्मार्ट होम

सेडिर इलेक्ट्रिक स्मार्ट होम हे एक असे स्मार्ट होम अप्लायन्स आहे ज्यामध्ये घरातील सर्व इलेक्ट्रिकल सर्किट जोडलेले असतील. त्याच्या सहाय्याने इलेक्ट्रिक कार व स्कूटरही चार्ज करता येऊ शकतील. अ‍ॅपच्या सहाय्याने बॅटरी बॅकअप राहील. सूर्यप्रकाश पडताच घरातील विजेचे दिवे आपोआप बंद होतील. जिथे जितकी गरज आहे तितकीच वीज खर्च होईल.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news