

कोलकाता; वृत्तसंस्था : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती बंगालमध्ये घडली आहे. सिलिगुडी येथे हत्येनंतर श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणे पती मोहम्मद अंसारुलकडून पत्नी रेणुकाच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. मासळ्या खाऊन टाकतील व पुरावा नष्ट होईल म्हणून लगतच्या महानंदा नंदीत हे तुकडे अंसारुलने फेकून दिले. अंसारुलला अटक करण्यात आली असून एका सुटकेसमध्ये रेणुकाचे धड पोलिसांना मिळून आले आहे; पण शीर आणि इतर अवयव अजूनही सापडलेले नाहीत. पोलिस महानंदा नदीपात्रात शोध घेत आहेत.
सिलिगुडीतील (जि. दार्जिलिंग) रेणुका या श्रद्धाप्रमाणेच अनेक दिवसांपासून बेपत्ता होत्या. रेणुकाच्या नातेवाईकांनी डिसेंबरअखेरीस पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू केला. रेणुकाचा पती अंसारुल पोलिसांच्या चौकशीत सतत जबाब बदलत होता. खाक्या दाखविला तेव्हा अंसारुलने गुन्हा कबूल केला. पत्नीचे चारित्र्य बरोबर नव्हते, असा बहाणा अंसारुल सध्या सांगतो आहे. अंसारुलने 24 डिसेंबर रोजी रेणुकाची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून महानंदा नदीत फेकून दिले. (Murder)
सहा वर्षांपूर्वी रेणुका-अंसारुलचे लग्न झाले होते. दादाभाई कॉलनीमध्ये दोघेही राहत होते. दोघांचा संसार चांगला चाललेला होता. बदलत्या वातावरणात अचानक रेणुकाची हत्या झाल्याने आम्हाला धक्का बसला, असे रेणुकाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. अंसारुलला फाशी द्या, अशी मागणी ते करत आहेत.
अधिक वाचा :