पुणे: ऑनलाईन 91 हजारांचा आयफोन मागविला, पैसे न देताच डिलेव्हरी बॉयच्या हातातून मोबाईल घेऊन काढला पळ | पुढारी

पुणे: ऑनलाईन 91 हजारांचा आयफोन मागविला, पैसे न देताच डिलेव्हरी बॉयच्या हातातून मोबाईल घेऊन काढला पळ

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून 91 हजारांचा मोबाईल घेऊन आलेल्या डिलेव्हरी बॉयच्या हातातून एकाने मोबाईल हिसकावून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर भागात पुरंदर प्लाझा येथील मिलेनियम स्कुल येथे घडला. करण पानिंद्रे (रा. कर्वेनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत रमेश चव्हाण (27, रा. हिल व्ह्यु रेसिडेन्सी, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतात. आरोपीने ऑनलाईन 91 हजारांचा आयफोन मागविला होता. आयफोनची डिलेव्हरी घेऊन चव्हाण हे इच्छितस्थळी गेले असता तेथून त्यांनी आरोपी पानिंद्रे याला फोन केला. त्याला फोन देऊन पैसे घ्यायचे होते. पानिंद्रे तेथे आला आणि त्याने डिलेव्हरी बॉयच्या हातातून मोबाईल घेतला, पण पैसे देण्यापूर्वीच तिथून पळ काढला. हा प्रकार 2 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. दरम्यान दुसर्‍या दिवशी चव्हाण यांना एका ठिकाणी पानिद्रे दिसला. त्याने त्याला पकडूनही ठेवले होते. परंतु, चव्हाण यांच्या हातातून तो निसटला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भिंडे करत आहेत.

Back to top button