Earthquake Tremors In Delhi : अफगानिस्तानातील भूकंपाचा दिल्लीला बसला हादरा | पुढारी

Earthquake Tremors In Delhi : अफगानिस्तानातील भूकंपाचा दिल्लीला बसला हादरा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मंगळवारी अफगानिस्तानला ५.९ रिश्टर स्केल इतका भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप इतका जोरदार होता की, याचे धक्के जम्मू काश्मीरसह दिल्ली पर्यंत जाणवले. दिल्ली एनसीआरसह जम्मू काश्मीर, पंजाब आणि संपूर्ण उत्तर भारतात या भूकंपाचे झटके जाणवले आहेत. (Earthquake Tremors In Delhi)

गुरुवारी संध्याकाळी दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (Earthquake Tremors In Delhi)

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 3.8 एवढी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले होते की, हरियाणातील झज्जरमध्ये दिल्ली आणि आसपासच्या परिसरात 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती.


अधिक वाचा :

Back to top button