डिजिटल इंडिया मोहीम प्रेरणादायी! मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांनी घेतली पीएम मोदींची भेट | पुढारी

डिजिटल इंडिया मोहीम प्रेरणादायी! मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांनी घेतली पीएम मोदींची भेट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जागतिक स्तरावरील आघाडीची आयटी कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे चेअरमन सत्या नाडेला यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेत विविध मुद्यांवर चर्चा केली. देशाच्या ‘डिजिटल इंडिया‘ मोहिमेस आपण निश्चितपणे सहकार्य करु, असे आश्वासन त्यांनी पंतप्रधान मोदी यांना चर्चेदरम्यान दिले.

डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून स्थिर आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न प्रेरणादायक आहे, असे नाडेला यांनी नंतर सोशल मीडीयाच्या माध्यमातून सांगितले. सत्या नाडेला हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते हैदराबाद आणि बंगळूर या शहरांनाही भेटी देणार आहेत.

       हेही वाचलंत का ?

 

 

 

 

Back to top button