जम्‍मू- काश्‍मीर : राजौरीत दहशतवादविरोधी निदर्शनावेळी ‘आयईडी’चा स्‍फोट; मुलीचा मृत्‍यू, पाच जखमी | पुढारी

जम्‍मू- काश्‍मीर : राजौरीत दहशतवादविरोधी निदर्शनावेळी 'आयईडी'चा स्‍फोट; मुलीचा मृत्‍यू, पाच जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्‍मू- काश्‍मीरमधील राजौरीत आज ( दि. २ ) दहशतवादविरोधी निदर्शनावेळी ‘आयईडी’चा स्‍फोट घडवून आणण्‍यात आला. राजौरीत रविवारी झालेल्‍या भ्‍याड दहशतवादी हल्‍ल्‍यात चार नागरिकांचा मृत्‍यू झाला होता. या हिंसाचाराच्‍या निषेध करण्‍यासाठी धांगरी गावात नागरिक जमले असताना ‘आयईडी’ स्‍फोट घडवून आणण्‍यात आला. या स्‍फोटात एका गंभीर जखमी झालेल्‍या मुलीचा मृत्‍यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्‍त पोलीस महानिरीक्षक ( एडीजीपी ) मुकेश सिंह यांनी दिली. घटनास्‍थळी आणखी एक आयईडी जप्‍त करुन तो निकामी करण्‍यात आल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

जम्मू-काश्मीरच्या राजौरीच्‍या धांगोरी आणि श्रीनगरच्या जडीबल येथे रविवारी ( दि. १) रात्री उशिरा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. धांगोरी गावात पोलिसांच्‍या गणवेषात आलेल्‍या दहशतवाद्यांनी प्रथम कुटुंबाकडे आधार कार्ड मागितले.  त्यांची ओळख पटवून  गोळीबार केला. या हल्‍ल्‍यात चौघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. मृतांमध्‍ये एका महिलेचाही समावेश आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिकांनी सोमवारी राजौरी शहरात पूर्ण बंदची हाक दिली होती. आज निदर्शने सुरु असताना दहशतवाद्‍यांनी आयडीचा स्‍फोट घडवून आणला. यामध्‍ये दोघे जण जखमी झाले आहेत.

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केला हल्‍ल्‍याचा निषेध

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी राजौरी हल्‍ल्‍याचा तीव्र निषेध केला आहे. नायब राज्‍यपाल कार्यालयाने म्‍हटले आहे की, “दहशतवाद्‍यांनी भ्‍याड हल्‍ला केला आहे. या हल्‍ल्‍यात मृत्‍युमुखी पडलेल्‍या नागरिकांच्‍या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत व सरकारी नोकरी दिली जाईल. गंभीर जखमी झालेल्‍या नागरिकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्‍यात येणार आहे.”

हेही वाचा : 

 

 

 

 

 

Back to top button