मास्टरमाईंड अलिगढचा बी.टेक. तरुण अटकेत
उच्चशिक्षित कोअर टीम चालवायची रॅकेट
५० कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवले होते
दैनिकांतही दिल्या होत्या जाहिराती
अस्सल भासणाऱ्या बनावट वेबसाईट्सचा वापर
भुवनेश्वर : वृत्तसंस्था, Job Fraud : पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालवले जाणारे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळा रॅकेट ओडिशा पोलिसांनी उघडकीला आणले आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून हे रॅकेट चालवणाऱ्या बी.टेक. शिकलेल्या म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. बनावट कॉलसेंटर, बनावट वेबसाईट, शेकडो बोगस सिम कार्ड, आर्थिक उलाढालीसाठी सुविधा केंद्रांचा आणि बनावट बँक खात्यांचा वापर, अशा पद्धतीने हे रॅकेट चालवले जात होते. उभे केले होते. अलिगढच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांतील ५० हजारांहून अधिक तरुणांना या रॅकेटच्या माध्यमातून गंडा घातला गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ओडिशा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथील जफर अहमद आहे. त्याला तेथील सिव्हिल लाईन्स भागातून अटक करण्यात आली आहे. तो बी.टेक. पर्यंत शिक्षण घेतलेला असून, त्यानेच हे सारे रॅकेट उभे केले होते. अलिगढच्या न्यायालयाने त्याला ट्रान्झिट रिमांड मंजूर केला असून दोन दिवसांत त्याला भुवनेश्वरला न्यायालयात हजर करून कोठडी घेतली जाणार आहे.
Job Fraud : हायटेक कारभार, दोन कॉल सेंटर्सही
उच्चशिक्षित अभियंत्यांची एक टोळीच हे रॅकेट चालवायची. जफर अहमद त्यांचा म्होरक्या होता. आठ ते दहा जणांचा हा कोअर ग्रुप वेबसाईट डिझायनिंगच्या कामात तज्ज्ञ होता. ते विविध सरकारी योजनांच्या नावाने वेबसाईट तयार करायचे. अस्सल वाटाव्यात अशाच त्या वेबसाईट असत. या कोअर ग्रुपच्या हाताखाली ५० जणांचे एक कॉल सेंटर चालवले जायचे. त्यातील कर्मचाऱ्यांना दरमहा १५ हजार रुपये पगार दिला जायचा.
Job Fraud : बनावट बँक खात्यांचा वापर
उत्तर प्रदेशातील जमालपूर आणि अलिगढ येथे ही दोन कॉल सेंटर्स होती. या संपूर्ण कामासाठी १ हजार बनावट सिम कार्ड्स, ५३० मोबाईल हँडसेट वापरले जायचे. सरकारी योजनेच्या नावावर सेव्ह केलेल्या नंबरवरून तरुणांशी फक्त व्हॉट्स अॅप कॉल्सच केले जायचे. या कथित भरतीसाठी आर्थिक व्यवहार करण्यासाठी तब्बल १०० बनावट बँक खाती उघडण्यात आली होती. या खात्यांवरील पैसे काढण्यासाठी त्यांनी जनसेवा केंद्रांचा व त्यांच्या क्यूआर कोडचा कटाक्षाने वापर केला.
Job Fraud : बोगस शुल्काच्या नावाखाली फसवणूक
प्रधानमंत्री योजनेच्या खाली आरोग्य, कौशल्य विकास आदी विभागांच्या भरतीच्या जाहिराती आपल्या बनावट वेबसाईटवर प्रकाशित करत. एवढेच नव्हे; तर त्यांनी चक्क दैनिकांतही अशा भरतीच्या जाहिराती दिल्या व मोबाईल नंबर्स दिले. त्यावर ते आशाळभूत उमेदवारांकडून नोंदणी, मुलाखत प्रशिक्षण व इतर बाबींसाठी ३ ते ५० हजार रुपये शुल्क आकारत.
हे ही वाचा :