पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन वर्षात देशासमोर अनेक आव्हाने असतील, ज्यामध्ये वाढत्या बेरोजगारीच्या (Unemployment) दरावर नियंत्रण ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. रविवारी (दि. १ डिसेंबर) सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने बेरोजगारीबाबत काही आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर (Unemployment rate) डिसेंबर २०२२ मध्ये 8.3 टक्के पर्यंत वाढला, जो गेल्या १६ महिन्यांतील उच्चांक आहे. (Unemployment Rate Jumps)
चिंता वाढविणारी बाब अशी की, CMIE च्या आकडेवारीनुसार देशातील शहरी बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 8.96 टक्के वरून 10.09 टक्के पर्यंत वाढला आहे, तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 7.55 टक्के वरून 7.44 टक्के वर आला आहे. बेरोजगारीची दरामध्ये विविध राज्यांमध्ये चढउतार आहे. हरियाणामध्ये सर्वात अधिक ३७.४ टक्के इतका तर उडिसामध्ये देशातील सर्वात कमी ०.९ टक्के इतका बेरोजगारी दर आहे. (Unemployment Rate Jumps)
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी दर महिन्याला देशभरातील बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करत असते. कोविड महामारी काळात देशातील बेरोजगारी शिखरावर पोहोचली होती. तेव्हापासून ती कमी कमी होत आली आहे. आता मागील वर्षातील डिसेंबरमधील समोर आलेली आकडेवारीनुसार भारतातील बेरोजगारीचा दराने मागील 16 महिन्यांच्या उच्चांकावर 8.30 टक्के पर्यंत पोहोचला आहे.
अधिक वाचा :