बारामती : बोगस रेशनकार्ड काढत केली शासनाची फसवणूक | पुढारी

बारामती : बोगस रेशनकार्ड काढत केली शासनाची फसवणूक

बारामती : पुढारी वृत्तसेवा : वडीलांच्या रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट असताना तेथील नाव कमी न करता बेकायदेशीर मार्गाने दुसरे बोगस केशरी रेशनकार्ड काढत त्याद्वारे शासकीय धान्य घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सदीप धनंजय भोसले (रा. कानाडवाडी, चोपडज, ता. बारामती) यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडजचे तलाठी अशपाक हनिफ इनामदार (रा. मुरुम, ता. बारामती) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली.

चोपडजमधील संदीप हनुमंत गाडेकर यांनी भोसले यांच्या बोगस रेशनकार्डाबाबत बारामतीच्या तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चौकशी करण्यात आली. संदीप भोसले हे कानाडवाडीचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडील धनंजय जयसिंग भोसले यांच्या नावे रेशनकार्ड असून त्यात संदीप यांचे नाव समाविष्ट आहे. ते कमी न करता त्यांनी तहसील कार्यालयात जात पत्नी मनिषा यांच्या नावे केशरी रेशनकार्ड मिळविले. त्याद्वारे शासनाकडून धान्य घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button