नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत किरकोळ घट नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात २२६ कोरोनाबाधितांची भर (Corona Update) पडली. तर, केरळमधे पूर्वी झालेल्या ३ कोरोना मृत्यूची नोंद घेण्यात आली. दरम्यान, सक्रिय कोरोना बाधितांच्या संख्येत ४४ ने वाढ नोंदवण्यात आली आहे. शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.८० टक्के आणि कोरोना मृत्यूदर १.१९ टक्क्यांवर स्थिर नोंदवण्यात आला. तर दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.१२ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.१५ टक्के नोंदवण्यात आला.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ४६ लाख ७८ हजारांहून अधिक (Corona Update) झाली आहे. यातील ४ कोटी ४१ लाख ४४ हजार २९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ३ हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ५ लाख ३० हजार ७०२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात कोरोना विरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत २२०.१० कोटी डोस लावण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत ९१ कोटींहून अधिक कोरोना तपासण्या करण्यात आल्या असून यातील १ लाख ८७ हजार ९८३ तपासण्या शुक्रवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.
हेही वाचलंत का ?