Tiger Kishan : लखनौमधील प्राणी संग्रहालयातील ‘किशन’ वाघाचा कर्करोगाने मृत्यू | पुढारी

Tiger Kishan : लखनौमधील प्राणी संग्रहालयातील 'किशन' वाघाचा कर्करोगाने मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील लखनौमधील नवाब वाजिद अली शाह प्राणी संग्रहालयातील किशन या नर वाघाचा (Tiger Kishan) कर्करोगाने मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.३०) सकाळी किशनचे निधन झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

१ मार्च २००९ रोजी किशनपूर व्याघ्र प्रकल्पातून किशनची (Tiger Kishan) सुटका करण्यात आली होती. दरम्यान, दुधवा राष्ट्रीय उद्यानाच्या आसपासच्या मानवी वस्तीला धोका निर्माण झाल्यानंतर १३ वर्षांपूर्वी किशनला प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले होते.
लखनौ प्राणी संग्रहालयात प्राथमिक तपासणीत किशनला हेमांगीओसारकोमा हा दुर्मीळ कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्या कानाजवळ आणि तोंडापर्यंत कर्करोग पसरू लागला होता. त्यामुळे त्याला वन्य प्राण्यांची शिकार करता येत नव्हती. तो मनुष्यभक्षक बनला होता.

प्राणिसंग्रहालयाचे संचालक व्ही. के. मिश्रा यांनी सांगितले की, किशनने त्याच्या शेवटच्या दिवसांत अन्न घेणे बंद केले होते. त्याची हालचालही कमी झाली होती. दरम्यान, त्याने शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button