मुख्तार अन्सारीच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी | पुढारी

मुख्तार अन्सारीच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पिस्तूल दाखवित तुरुंग अधिकाऱ्याला धमकाविल्याच्या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेला उत्तर प्रदेशचा माजी आमदार मुख्तार अन्सारी याने शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.

उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठाने गत सप्टेंबर महिन्यात मुख्तारला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुख्तारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. गॅंगस्टर उर्फ राजकारणी असलेल्या मुख्तारवर असंख्य गुन्हे दाखल आहेत. तुरुंग अधिकाऱ्याला धमकाविल्याच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले होते. तथापि अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करीत त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. मऊ विधानसभा मतदारसंघातून तब्बल सहावेळा मुख्तारने विजय मिळवला होता.

        हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button