Covishield : ‘सिरम’ देणार कोव्हिशिल्डचे 2 कोटी डोस मोफत! | पुढारी

Covishield : ‘सिरम’ देणार कोव्हिशिल्डचे 2 कोटी डोस मोफत!

कोल्हापूर, विशेष प्रतिनिधी : जगभरात कोरोनाच्या संसर्गाचा चढता आलेख लक्षात घेऊन केंद्र सरकार खबरदारीचे उपाय योजत असतानाच पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने केंद्राला मदतीचा हात दिला आहे. सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणून या कंपनीने कोव्हिशिल्ड (Covishield) या कोरोनावरील लसीचे 2 कोटी डोस भारत सरकारला मोफत देण्याची तयारी दाखविली असून 410 कोटी रुपयांच्या या लसींच्या वितरणासाठी सध्या आरोग्य मंत्रालयात धावपळ सुरू आहे.

हद्दपार झाला…, संपला… असे म्हणत असतानाच जगभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या (Covishield) भीतीची छाया निर्माण झाली आहे. चीनमध्ये या साथीचा मोठा उद्रेक झाल्याचे वृत्त समोर येताना युरोपात जपान, जर्मनीसह अनेक देशांमध्ये स्थिती पुन्हा चिंताजनक वळणावर आहे, तर अमेरिकेतही या साथीने आपले डोके वर काढले आहे.

या पार्श्वभूमीवर भारतात मॉकड्रिल सुरू झाले आहे. विमानतळावर परदेशी प्रवाशांच्या चाचण्या घेण्यारी यंत्रणा तैनात झाली आहे. अशा स्थितीत भारतात ज्यांनी अद्याप कोरोनाच्या लसीचा डोस (Covishield) घेतलेला नाही, त्यांना लसीपासून संरक्षण मिळावे, यासाठी सिरमने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा : 

Back to top button