Heeraben Modi : पंतप्रधान मोदी यांना मातृशोक, अमित शहा यांच्यासह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली | पुढारी

Heeraben Modi : पंतप्रधान मोदी यांना मातृशोक, अमित शहा यांच्यासह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

पुढारी ऑनलाइन डेस्क : Heeraben Modi : ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूज्य मातोश्री हीरा बा यांच्या स्वर्गवासाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आई एक अशी व्यक्ती आहे जी जीवनातील पहिली मित्र आणि गुरू असते. आईची छत्रछाया हरवणे हे या जगातील सर्वात मोठे दुःख आहे यात शंका नाही.” असे ट्वीट करत अमित शहा यांनी हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे साडेतीन वाजता निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करून याची माहिती दिली. त्यानंतर अमित शहा यांच्यासह राजकीय तसेच अन्य सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी ट्विट करून हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली.

Heeraben Modi : अमित शहा यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, हीरा बा यांनी ज्या संघर्षातून सामना करत संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण केले ते सर्वांसाठीच एक आदर्श आहे. त्यांचे त्यागपूर्ण तपस्वी जीवन सदैव आमच्या स्मृतित राहील. पूर्ण देश दुःखाच्या या घडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिवार त्यांच्या सोबत आहे. कोट्यावधी लोकांची प्रार्थना आपल्या सोबत आहे. ओम शांति, असे ट्वीट गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

हे ही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक : आई हिराबेन मोदी यांचे निधन

Back to top button