पुढारी ऑनलाईन : भारत बायोटेक या कंपनीने कोरोनाविरोधात नाकातून द्यायची लस विकसित केली आहे. iNCOVACC असे नाव असलेली ही लस ८०० रुपयांना मिळणार आहे. यावर ५ टक्के इतका जीसीटी लागेल. तर सरकारी हॉस्पिटलमध्ये ३२५ रुपये इतकी किंमत असेल. (Covid Nasal Vaccine Price)
१८ वर्षांवरील व्यक्तींना बुस्टर डोस म्हणून ही लस दिली जाणार आहे. कोरोना विरोधात नाकातून द्यायची ही जगातील पहिलीच लस आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या देशातील विविध भागात घेण्यात आल्या आहेत. ही लस दिल्यानंतर व्यक्तीच्या लाळेत चांगल्या संख्येने अँटीबॉडी तयार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे श्वसन संस्थेच्या वरच्या भागाला कोरोनाची लागण कमी होते आणि कोरोनाचा फैलाव होण्यासही आळा बसतो.
Heterologous बुस्टर डोस याचा अर्थ पहिल्या डोसपेक्षा बुस्टर डोस वेगळ्या प्रकारचा घेणे. उदा. जर पहिला डोस कोव्हॅक्सिनचा असेल आणि बुस्टर म्हणून नाकातून द्यायची ही लस घेता येते.
नाकातून द्यायची लस बनवताना त्याची किंमत शक्य तितकी कमी ठेवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.
कोव्हॅक्सिनची निर्मितीही भारत बायोटेक्सने केलेली आहे. गेल्याच आठवड्यात या लसीला कोव्हिड – १९ विरोधी लसीकरण कार्यक्रमात समाविष्ठ करण्यात आले आहे.
हेही वाचा