Typhoid Vaccine : गोवरनंतर टॉयफॉईडचे संकट – तज्ज्ञांनी केले लसीकरणाचे आवाहन

Typhoid Vaccine : गोवरनंतर टॉयफॉईडचे संकट – तज्ज्ञांनी केले लसीकरणाचे आवाहन
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतासह जगातील काही भागांत गोवरची साथ आहे. १६००० मुलांना गोवरची लागण झाली तर फक्त मुंबईत २० मुलांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मृत्यू झालेल्या मुलांतील फक्त एकाच मुलाला गोवरचा पहिला डोस दिला गेला होता. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी टॉयफॉईडच्या साथीचा इशारा दिला असून लसीकरणाचे आवाहन केले आहे. (Typhoid Vaccine)

टॉयफॉईड किंवा विषमज्वर या आजारावर लस उपलब्ध आहे, पण भारताच्या लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्यात आलेला नाही. The Scroll या वेबसाईटने याबद्दलेच वृत्त दिले आहे.

टायफॉईड हा आजार Salmonella Typhi bacteria या जीवाणूपासून होतो. दूषित पाणी किंवा अन्नातून या जीवाणूची बाधा होते. दरवर्षी भारतात ८० लाख लोकांना हा आजार होतो. हा आजार बळावला तर न्युमोनिया, शरीरात रक्तस्राव होऊन मृत्यू होतो. जगभरात दरवर्षी १ लाख ६० हजार लोकांचा यात मृत्यू होतो. यातील ४० टक्के मृत्यू भारतात होतात.

National Technical Advisory Group on Immunisation ही शासकीय गट भारत सरकारला लसीकरणाबद्दचे धोरण ठरवण्यासाठी मदत करतो. या गटाच्या उपसमितीने जून महिन्यात टॉयफॉईडची लस सार्वजनिक लसीकरणाच्या कार्यक्रमात समाविष्ट करावी असे सूचवले आहे. विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. गगनदीप कंग या समितीचे अध्यक्ष आहेत. जर टॉयफॉईडसाठी लसीकरण झाले नाही तर येत्या दहा वर्षांत भारतात ८९३०० लोकांचा मृत्यू या आजाराने होईल, असा इशाराही या समितीने दिला आहे.

बाजारात टॉयफॉईडची लस उपलब्ध आहे. पण या लसीची किंमत २००० ते २५०० रुपये इतकी जास्त आहे. सध्या ज्यांना परवडते, ते लोकची ही लस घेतात, अशी माहिती डॉ. जयप्रकाश मुल्लीयीली यांनी दिली आहे. डॉ. जयप्रकाश हेही National Technical Advisory Group on Immunisation या समितीचे सदस्य आहेत.

टायफॉईडची लस सर्वप्रथम ब्रिटनमध्ये १८९६ला बनली. २०१३ला भारत बायोटेक आणि त्यानंतर २०२१ला बायालॉजिकल इ या कंपन्यांनी भारतात स्वदेशी लस बनवली. भारतात सध्या टायफॉईडच्या ४ लसी उपलब्ध आहेत. National Technical Advisory Group on Immunisationने २०१६मध्ये सर्वप्रथम देशात टॉयफॉईडची पाहाणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच २०१८मध्ये मुंबईत ९ महिने ते १५ वर्ष वयाच्या मुलांना प्रायोगिक पातळीवर ही लस देण्यात आली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news