Bharat Biotech | भारत बायोटेकच्या नाकातून दिला जाणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी | पुढारी

Bharat Biotech | भारत बायोटेकच्या नाकातून दिला जाणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत बायोटेकच्या (Bharat Biotech)  इंट्रानासल बूस्टर डोसला प्रतिबंधित वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकच्या इंट्रानासल ‘फाइव्ह आर्म्स’ कोविड बूस्टर डोसला मर्यादित वापरासाठी मान्यता मिळाली आहे. कोरोना लसीचा हा बूस्टर डोस इंजेक्शनऐवजी नाकातून दिला जाणार आहे. भारत बायोटेकचा दावा आहे की हा नाकाचा डोस आतापर्यंत वापरल्या जात असलेल्या कोरोना लसीपेक्षा वेगळा आणि अधिक प्रभावी आहे.

दरम्यान,  (Bharat Biotech) शुक्रवारी (दि.२५) सकाळी ८ वाजता अद्ययावत केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात एका दिवसात 347 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण रुग्ण संख्या 4,46,70,830 झाली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या 5,516 वर घसरली आहे. गेल्या 24 तासांत दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांची संख्या 5,30,604 वर पोहोचली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button