WhatsApp यूजर्स सावधान! ३१ डिसेंबरपासून ‘या’ ४९ फोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप बंद, पाहा संपूर्ण यादी | पुढारी

WhatsApp यूजर्स सावधान! ३१ डिसेंबरपासून 'या' ४९ फोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप बंद, पाहा संपूर्ण यादी

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२२ वर्ष संपत असताना व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) यूजर्संसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. WhatsApp आता काही Android आणि Apple डिव्हाइसेसला सपोर्ट देणे थांबवणार आहे. ३१ डिसेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅप एकूण ४९ फोन्सवर काम करणे बंद करणार आहे. यात Apple, Samsung आणि इतर काही फोन ब्रँडचा समावेश आहे. मोबाइल तंत्रज्ञान मीडिया GizChina ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरवर्षी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp अनेक फोन्ससााठी आपला सपोर्ट थांबवते. जसजसे २०२२ वर्ष संपत आहे, तसतसे व्हॉट्सअ‍ॅप काही अँड्रॉइड फोन्ससाठी तसेच काही आयफोन्सना त्याचा सपोर्ट बंद करत आहे. पण बहुतांश यूजर्संना काळजी करण्याची गरज नाही. कारण व्हॉट्सअ‍ॅप त्याचा सपोर्ट जुन्या आणि कालबाह्य ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोन्ससाठी थांबवत आहे.

व्हॉट्सअॅपचा हा निर्णय कंपनीच्या यूजर्संना सर्वोत्तम अनुभव तसेच मानक सुरक्षा आणि प्रायव्हसी फिचर्स प्रयत्नांचा एक भाग म्हणून आला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे ३१ डिसेंबरपासून ४९ फोन्सचे यूजर्स यापुढे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवू शकणार नाहीत. या सूचीतील बहुतेक फोन्स जुन्या मॉडेलचे असून काही लोकच त्याचा वापर करतात.

जाणून घ्या त्या ४९ स्मार्टफोन्सची यादी (त्यापैकी काही Apple चे) ज्यावर ३१ डिसेंबरनंतर WhatsApp चालणार नाहीत…

Lenovo A820, LG Enact, LG Lucid 2, LG Optimus 4X HD, LG Optimus F3, LG Optimus F3Q, LG Optimus F5, LG Optimus F6, LG Optimus F7, LG Optimus L2 II, LG Optimus L3 II, LG Optimus L3 II Dual, LG Optimus L4 II, LG Optimus L4 II Dual, LG Optimus L5, LG Optimus L5 Dual, LG Optimus L5 II, LG Optimus L7, LG Optimus L7 II, LG Optimus L7 II Dual, LG Optimus Nitro HD, Grand S Flex ZTE, Grand X Quad V987 ZTE, HTC Desire 500, Huawei Ascend D, Huawei Ascend D1, Huawei Ascend D2, Huawei Ascend G740, Huawei Ascend Mate, Huawei Ascend P1, Quad XL, Apple iPhone 5, Apple iPhone 5c, Archos 53 Platinum, Memo ZTE V956, Samsung Galaxy Ace 2, Samsung Galaxy Core, Samsung Galaxy S2, Samsung Galaxy S3 mini, Samsung Galaxy Trend II, Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy Xcover 2, Sony Xperia Arc S, Sony Xperia miro, Sony Xperia Neo L, Wiko Cink Five, Wiko Darknight ZT.

हे ही वाचा :

Back to top button