Whatsapp वर येतोय ‘Hi mum’ मेसेज, यूजर्संचे  ५४ कोटी उडाले, वाचा काय आहे प्रकरण?

Cyber Fraud Hii Mum
Cyber Fraud Hii Mum
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलिकडे जगभरात फसवणूक करणारे लोक  बॅंकांमधील पैसा आपल्या अकाउंटवर हस्तांतरित करणे, एटीएम कार्ड घोटाळा, यूपीआय घोटाळा किंवा सिम स्वॅप घोटाळा अशी सायबर फ्रॉडची  प्रकरणे वाढताना दिसत आहेत. सायबर फ्रॉडची आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ऑस्ट्रेलियात अशी  प्रकरणे समोर आली आहेत. जिथे फसवणूक करणारे आता पीडितेच्या कुटुंबीयांना मोबाईल हरवण्याच्या बहाण्याने व्हॉट्सॲपला मेसेज करुन पैसे पाठवण्यास सांगत आहेत. आतापर्यंत या फ्रॉडमधून ५४ कोटींहून लुटण्यात आले आहेत.

'हाय मम' (Hi mum) किंवा "तोतयागिरी" हा काय घोटाळ्याचा प्रकार आहे असा विचार करता असाल. हा प्रकार ऑस्ट्रेलियात वाढत असल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये फसवणूक करणारे पीडित व्यक्तींशी WhatsApp वर  बोलत असतात. जवळचे मित्र किंवा कुटुंबीय म्हणून संपर्क साधून आणि त्यांना मदतीची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांचा फोन हरवला आहे किंवा ते कुठेतरी अडकले आहेत आणि वेगळ्या नंबरवरून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा त्यांच्या बोलण्याला बळी पडल्यानंतर ते त्यांना पैसे पाठवण्यास सांगतात.

अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की 1,150 हून अधिक लोक या घोटाळ्याला बळी पडले आहेत. अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत लोकांनी सुमारे 2.6 डाॅलर दशलक्ष म्हणजेच सुमारे 21 कोटी रुपये गमावले आहेत. 2022 मध्ये किमान 11,100 लोकांचे 7.2 दशलक्ष डाॅलर (रु. 57.84 कोटी) चोरीला गेले आहेत आणि घोटाळ्याची बहुतेक प्रकरणे 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांद्वारे नोंदवली गेली आहेत.

भारतातही अशी प्रकरणे

ही प्रकरणे ऑस्ट्रेलियात वाढत असताना, भारतीयांनाही हा इशारा देण्यात आला आहे. कारण भारतात गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीतही वाढ झाली आहे. अलीकडेच दिल्लीतील एका व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली आणि त्याच्या विविध बँक खात्यांमधून सुमारे 50 लाख रुपये काढून घेण्यात आले. सिम स्वॅपिंग, क्यूआर कोड घोटाळा आणि फिशिंग लिंकची अनेक प्रकरणे व्हायरल होत आहेत. त्यामुळे या सायबर फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सावध आणि जागरूक राहणे.

सायबर फसवणुकीपासून कसे सुरक्षित रहावे

1. तुमचा OTP कधीही कोणाशीही शेअर करू नका.

2. तुमचा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पिन  कोणाशीही शेअर करू नका, मग ते तुमचे  कुटुंब असो किंवा मित्र असो.

3. अज्ञात संपर्कांनी पाठवलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.

4. फक्त सुरक्षित आणि अधिकृत वेबसाइट्सद्वारे ब्राउझ करा.

5. लॉगिन आणि संदेशांबद्दल नेहमी सतर्क रहा.

6. ऑनलाइन खरेदी करताना तुमचा पेमेंट तपशील वेबसाइटवर कधीही सेव्ह करू नका.

7. जर कोणी बँक तपशील, UPI आणि इतर तपशील विचारत असेल तर नेहमी सावध रहा.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news