WhatsApp View Once Feature : व्हॉट्सॲपचं आणखी एक भन्नाट फिचर; मेसेज एकदाच वाचता येणार | पुढारी

WhatsApp View Once Feature : व्हॉट्सॲपचं आणखी एक भन्नाट फिचर; मेसेज एकदाच वाचता येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही  व्हॉट्सॲपवरुन एखाद्याशी संवाद साधत आहात. त्या व्यक्तीला तुम्ही मेसेज केला असेल आणि तुमची इच्छा आहे की तो समोरच्या व्यतीने एकदाच वाचायला (View Once Feature) हवा. तर आता हे व्हॉट्सॲपच्या नव्या फिचरमुळे शक्य झाले आहे. व्हॉट्सॲपने आपल्या युजर्ससाठी आणखी एक भन्नाट असं फिचर आणलं आहे. या फिचरमुळे तुम्ही पाठवलेला व्हॉट्सॲप  मेसेज हा एकदाच वाचू शकणार आहे.  वाचा नेमकं काय आहे या नव्या फिचरचा फायदा.

आजच्या घडीला सोशल मीडियामध्ये सर्वात लोकप्रिय कोणतं माध्यम असेल तर ते म्हणजे फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सॲप. तुमच्या आजुबाजूला लोकांमध्ये स्मार्टफोन आहे आणि त्यामध्ये व्हॉट्सॲप नाही आहे असं क्वचितच आढळेल. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सना नवनवीन नेहमी हटके आणि धमाकेदार फिचर देत असल्याने हल्ली सोशल मीडिया युजर्समध्ये  त्याची लोकप्रियताही वाढू लागली आहे.  

WABetainfo या वेबसाईटच्या माहितीनुसार आता आणखी एक नवे फिचर व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या युजर्ससाठी आणले आहे. ते म्हणजे फक्त एकदाच मेसेज वाचू शकणार आहेत. एका अहवालानूसार व्ह्यू वन्स फिचर  View Once Feature आणलं आहे. या फिचरच्या वापराने तुम्ही पाठवलेला मेसेज फक्त एकदाच वाचू शकणार आहात. आणि विशेष म्हणजे या मेसेजचा तुम्ही स्क्रिनशॉटही काढू शकणार नाही.

View Once Feature : असं असेल फिचर

व्हॉट्सॲपने याआधीही फोटो आणि व्हिडिओबाबतीत View Once Feature चा वापर केला होता. आता व्हॉट्सॲपने View Once Feature हे मेसेजसाठी वापरता येणार असल्याचे सांगितले आहे. वेबे इन्फोच्या अहवालानूसार या फिचरवर अजुन काम सुरु आहे. या नव्या फिचरमुळे View Once Feature मधून पाठवलेला मेसेज एकदाच वाचू शकणार आहे आणि त्याचा स्क्रिनशॉटही काढू शकणार नाही. त्याचबरोबर या अहवालात असही सांगण्यात आलं आहे की, हे फिचर काम करण्यासाठी चॅटबार जवळ एक खास असं बटन दिलं जाईल. अजून या फिचरवर व्हॉट्सॲप काम करत आहे. लवकरच व्हॉट्सॲपचं हे नवं फिचर युजर्ससाठी उपलब्ध होणार  आहे.

हेही वाचा 

Back to top button