दिल्ली : दिल्लीच्या विकासपुरीमध्ये आग, अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी

दिल्ली : दिल्लीच्या विकासपुरीमध्ये आग, अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी

पुढारी ऑलाईन: पश्चिम दिल्लीतील विकासपुरी येथील डीडीए मार्केटमध्ये शनिवारी (दि.२४) सकाळी आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या दुर्घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही…

दिल्लीतील एच-ब्लॉक डीडीए मार्केटमधील एका सामान्य दुकानाच्या तळघर, तळमजला आणि पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विकासपुरी परिसरातून आगीचा फोन आल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या १८ गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news