Delhi : पत्नीशी भांडल्यानंतर बापाने २ वर्षाच्या चिमुकल्याला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकले | पुढारी

Delhi : पत्नीशी भांडल्यानंतर बापाने २ वर्षाच्या चिमुकल्याला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकले

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राजधानी दिल्लीतील (Delhi) कालकाजी भागात एका बापाने आपल्या अवघ्या २ वर्षाच्या मुलाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन फेकून दिले. जवळ जवळ २१ फुटावरुन अवघ्या २ वर्षाच्या मुलाला खाली फेकल्यानंतर बापानेसुद्धा पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. या घटनेत दोघे बाप-लेक गंभीर जखमी असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बायकोशी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर बापाने मुलाला पहिल्या मजल्यावरुन फेकले. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे.

कालकाजी (Delhi) पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दोन वर्षांच्या मुलाला वरुन फेकल्याचे व एक व्यक्ती सुद्धा पहिल्या मजल्यावरुन पडून जखमी असल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच समजले की, ओखलाच्या संजय कॉलनीमध्ये राहणारा ३० वर्षांच्या मानसिंह कालकाजी भागात पोहचला होता. यावेळी त्याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले. मानसिंह सोबत त्याच्या पत्नीचे सतत भांडण होत होते म्हणून त्याची पत्नी दोन मुलांसह तिच्या बहिणीकडे कालकाजी भागात रहात होती.

शुक्रवारी ६ वाजता मानसिंह हा दारुच्या नशेत धुत होऊन पत्नी पूजाला भेटण्यासाठी पोहचला. यानंतर दोघांचे पुन्हा भांडण पेटले. तेव्हा मानसिंहने चिडून आपल्या दोन वर्षाच्या मुलाला पहिल्या मजल्यावरुन म्हणजे जवळ जवळ २१ फूटावरुन खाली फेकले आणि त्या नंतर त्याने स्वत: देखील पहिल्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. (Delhi)

या घटनेनंतर दोघेही बाप बेटे वरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. जखमी मानसिंहला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तसेच मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्याप दोघांची अवस्था नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कालकाजी पुलिसांनी सांगितले की, मानसिंहवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे.


अधिक वाचा :

Back to top button