लखनऊ; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेश विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी (दि.२०) अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात काँग्रेसने शिवराज सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. तसेच हा प्रस्ताव सभापती गिरीश गौतम यांनी स्वीकारला आहे. अविश्वास प्रस्तावावर उद्या (दि.२१) चर्चा होणार आहे. दुसरीकडे, याआधीही अधिवेशनाच्या दिवसाची सुरुवातच गदारोळाने झाली. यावेळी काँग्रेस आमदारांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. (MP Politics)
विरोधी पक्षनेते गोविंद सिंह म्हणाले की, काँग्रेसने शिवराज सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सभागृहात आणला आहे, यावेळी सर्व आमदार चर्चेसाठी तयार आहेत. तर काल मुख्यमंत्री निवसास्थानी भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. ज्यामध्ये मुख्यमंत्री शिवराज यांच्यासह सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानसह भाजपचे आमदार उपस्थित होते. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या अविश्वास ठरावाला लक्ष्य करण्यासाठी भाजपनेही पूर्ण तयारी केली आहे. (MP Politics)
भाजपने आखली रणनीती
खरे तर विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांनी अविश्वास ठराव मंजूर केला आहे, अशा स्थितीत त्यावर आता चर्चा होईल, मात्र भाजपनेही अविश्वास ठरावाविरोधात रणनीती आखली आहे. पक्षाने सर्व आमदारांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. विधानसभा गृह आणि संसदीय कामकाज मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, सरकार सर्व घटकांसाठी सातत्याने काम करत असल्याने सरकारच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव अयशस्वी होईल. अशा परिस्थितीत आम्हीही पूर्ण तयारी केली आहे.
विधानसभेचे हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरताना दिसत आहे. एकीकडे काँग्रेसचे सर्व आमदार आक्रमक रणनीती आखत सरकारला घेरत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे आमदारही विरोधकांना सडेतोड उत्तरे देत आहेत.
अधिक वाचा :