FIFA WC Final : मेस्सीच्या ‘त्या’ दुसऱ्या गोलवरून मोठा वाद, कारण… | पुढारी

FIFA WC Final : मेस्सीच्या ‘त्या’ दुसऱ्या गोलवरून मोठा वाद, कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रोमांचकारी झाला. निर्धारीत 90 मिनिटांच्या कालावधीत 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर सामना एस्क्ट्रा टाईममध्ये खेळवण्यात आला. यामध्ये मेस्सीने 108 व्या मिनिटाला फ्रान्सचे गोलजाळे भेदले आणि अर्जेंटिनाला पुन्हा 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. पण सध्या मेस्सीच्या या गोलवरून वाद निर्माण झाला असून अनेक फुटबॉलप्रेमींनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

लिओनेल मेस्सी आणि एंजल डी मारिया यांनी पहिल्या हाफमध्ये प्रत्येकी 1-1 गोल करून अर्जेंटिनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. फुटबॉलमध्ये अखेरच्या सेकंदातही काही होऊ शकते याची प्रचिती वर्ल्डकप फायनलमध्ये आली. 80 व्या मिनिटापर्यंत 2-0 अशा आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला 1 मिनीट व 37 सेकंदात दोन धक्के बसले. कायलिन एम्बाप्पेच्या दोन गोलने फ्रान्सच्या पाठीराख्यांमध्ये प्राण फुंकले. 8 मिनिटांच्या भरपाई वेळेत दोन्ही संघांच्या गोलरक्षकाने एकेक गोल रोखला अन् सामना अतिरिक्त 30 मिनिटांत गेला. पहिली 15 मिनिटे तोडीस तोड खेळ झाल्यानंतर लियोनल मेस्सीची जादू पुन्हा चालली अन् त्याने 108 व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून दिला असे वाटत असताना एम्बाप्पेने गोल करून सामना 120 मिनिटांच्या खेळात 3-3 असा बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शुटआऊटमध्ये फ्रान्सने सामना गमावला.

फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लॉरिसने अर्जेंटिनाचा गोल करणयाच्या पहिला प्रयत्न अडवल्यानंतर चेंडू पुन्हा मेस्सीकडे गेला आणि त्यांने रिबाऊंड फटका मारला. याचबरोबर हा चेंडू वेगाने गोलजाळ्याच्या आत असणा-या फ्रेंच बचावपटूच्या पायावर आडळून परत बाहेर आला. रेफरींनी हा गोल असल्याचे जाहीर करताच अर्जेंटिनाच्या गोटात पुन्हा जल्लोष झाला. मेस्सीच्या संघाने पुन्हा एकदा 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. पण हा गोल नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा;

Back to top button