मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : सुकेश चंद्रशेखरच्‍या पत्नीशी संबंधित २६ कार जप्त करण्याचे आदेश

Jacqueline and Sukeshwww.pudharinews
Jacqueline and Sukeshwww.pudharinews
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असणार्‍या सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना मारियाची २६ कार जप्त करण्याचे आदेश पटियाला हाऊस कोर्टाने दिले आहेत. याप्रकरणी आज अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. जॅकलीनसोबत तिचे वकील प्रशांत पाटील, शक्ती पांडेदेखील उपस्थित होते. तसेच सुकेश चंद्रशेखरदेखील उपस्थित होता.  न्‍यायालयात प्रथमचसुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन आमने-सामने उपस्थित होते.

लीनाशी संबंधित कार जप्त करण्याचे आदेश

न्‍यायालयाने 'ईडी'ला २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सुकेशची पत्नी लीना मारिया पॉलशी संबंधित २६ कार ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे. जॅकलीन फर्नांडीसने २३ डिसेंबरपासून बहरीनचा प्रवास करण्याच्या परवानगीसाठी एक अर्ज दाखल केला आहे. कोर्टाने ईडीला २२ डिसेंबरपर्यंत याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. आता मनी लॉन्ड्रींग प्रकरणाची सुनावणी ६ जानेवारी, २०२३ पर्यंत टळली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news