कोल्हापूर : करवीर मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; उद्या सकाळी साडेआठपर्यंत सादळे-मादळे, कावणे, वडणगेचा निकाल

कोल्हापूर : करवीर मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; उद्या सकाळी साडेआठपर्यंत सादळे-मादळे, कावणे, वडणगेचा निकाल
Published on
Updated on

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुका ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दि. २० रोजी सकाळी आठ वाजलेपासून बहुद्देशीय हॉल, रमनमळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार आहे. प्रशासनाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून १८ टेबलवर १६ फेरीमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीचे निकाल साडेआठ वाजता तर प्रत्येक फेरीचा निकाल दर अर्ध्या तासाने घोषित होण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे निकाल स्पष्ट होतील.

५३ ग्रामपंचायतीसाठी फेरीनिहाय मतमोजणी होणाऱ्या ग्रामपंचायती अशा 

पहिली फेरी : सादळे-मादळे, कावणे, वडणगे.
दुसरी फेरी : हिरवडे खालसा, प्रयाग चिखली, वरणगे, नेर्ली, विकासवाडी.
तिसरी फेरी : दिंडनेर्ली, हसुर दुमाला, परिते, कसबा बीड.
चौथी फेरी : सोनाळी, आरळे, सावर्डे दुमाला, सडोली दुमाला, पासार्डे, चिंचवडे तर्फे कळे.
पाचवी फेरी : पाडळी बुद्रुक, गांधीनगर, हिरवडे दुमाला.
सहावी फेरी : सरनोबतवाडी, वळीवडे, भुये.
सातवी फेरी : उजळाईवाडी, कणेरीवाडी, चुये.
आठवी फेरी : मोरेवाडी, कांडगांव, दऱ्याचे वडगांव, वड्डवाडी.
नववी फेरी : पाचगांव.
दहावी फेरी : कणेरी, गोकुळ शिरगांव, बोलोली. शिपेकरवाडी- दुर्गुळवाडी.
अकरावी फेरी : सांगरुळ निगवे खालसा.
बारावी फेरी : वसगडे, कळंबे तर्फे ठाणे, कांचनवाडी.
तेरावी फेरी : शिंगणापूर, वाकरे, कंदलगांव, हणबरवाडी.
चौदावी फेरी : उचगांव प्रभाग क्र. १ ते ४, मांडरे.
पंधरावी फेरी : उचगांव प्रभाग क्र. ५ ते ६ म्हाळुंगे, नंदवाळ, दोनवडे.
सोळावी फेरी : शेळकेवाडी, नागांव, जैताळ, आंबेवाडी.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news