ISRO : एकाच वेळी 8 नॅनो सॅटेलाइट लाँच करण्यासाठी इस्रो सज्ज! | पुढारी

ISRO : एकाच वेळी 8 नॅनो सॅटेलाइट लाँच करण्यासाठी इस्रो सज्ज!

पुढारी ऑनलाइन डेस्क – इस्रो लवकरच एक नवीन उपलब्धी मिळवण्यास सज्ज झाले आहे. इस्रो शनिवारी (दि.26) श्रीहरिकोटा अंतरिक्ष केंद्रातून ओशन सैट -3 आणि 8 नॅनो सॅटेलाइटसह पीएसएलवी -सी 54 – IOS-06 मिशन लाँच करणार आहे. यामध्ये भूटानच्या एका सॅटेलाइटचा देखिल समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती देताना इस्रोने सांगितले की शनिवारी (दि.26) सकाळी 11 वाजून 56 मिनटांनी लाँच होईल. ईओएस-6 (ओशन सॅट -3) आणि 8 नॅनो सॅटेलाइटमध्ये पिक्सेल से, आनंद, भूटान सॅट, ध्रुव अंतरिक्षचे दोन थायबोल्ट आणि स्पेसफ्लाइट यूएसए चे 4 एक्स्टोकास्ट लाँच केले जाईल.

यापूर्वी इस्रोने देशाच्या पहिल्या खासगी रॉकेट विक्रम-एसला सफलतापूर्वक लाँच केले होते. श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटर ने शुक्रवारी (दि.18 नोव्हेंबर) सकाळी 11.30 वाजता अंतरिक्षात भारताने इतिहास रचला होता.

इस्रोने रॉकेटला कमी बजेटमध्ये लाँच करण्याचा प्लान केला आहे. या लॉन्चिंगमध्ये सामान्य इंधन ऐवजी लिक्विड नॅचरल गॅस (LNG) आणि लिक्विड ऑक्सीजन (LOX) वापरण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

ISRO : ‘विक्रम-एस’- पहिले खासगी रॉकेट उड्डाणासाठी सज्ज; श्रीहरिकोटातून होणार आज प्रक्षेपण

ISRO ने केली मंगळ, शुक्र ग्रहावर लँड मिशनसाठी IAD तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी

Back to top button