Koo’s Twitter Handel : ट्विटरने प्रतिस्पर्धी ‘कू’चे अकाउंट केले निलंबित, निर्णयावर प्रश्‍नचिन्‍ह | पुढारी

Koo's Twitter Handel : ट्विटरने प्रतिस्पर्धी 'कू'चे अकाउंट केले निलंबित, निर्णयावर प्रश्‍नचिन्‍ह

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरची मालकी एलॉन मस्‍क यांच्‍याकडे गेल्‍यापासून ट्विटरच्‍या निर्णयात अनेक बदल झाले आहेत. आता ट्विटरने  प्रतिस्पर्धी असलेलं मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कूचं ट्विटरवरुन अकाउंट निलंबित केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१६) करण्‍यात आली. मस्कच्या या निर्णयावरुन सोशल मीडियामध्‍ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Koo’s Twitter Handel )

 ट्विटरने शुक्रवारी (दि.१६) कुचं ट्विटर हॅंडल निलंबीत केले. ‘कु’चं @kooeminence ला भेट दिल्यास लक्षात येईल की, हे खाते निलंबित केले गेले आहे. त्यामुळे त्याचे ट्विट आता दिसणार नाही. नुकतंच ट्विटरने  प्रथितयश पत्रकारांची खाती निलंबित केली आहेत. या निर्णयावर सरकारी अधिकारी, पत्रकारिता संघटना आणि वकिलांच्या गटांकडून जोरदार टीका झाल्यानंतर खाती पुन्हा सुरू करण्यात आली.

Koo’s Twitter Handel : कु प्लॅटफॉर्म  ट्विटरसाठी सर्वोत्तम पर्याय

कू सह-संस्थापक, मयंक बिडवाटका, कु चं अकाउंट निलंबित केल्यानंतर बोलताना म्हणाला, “कु हा प्लॅटफॉर्म  ट्विटरसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मी हे आधीही सांगितले आहे. आम्ही कू चालवतो आणि पत्रकारांनी फक्त स्थलांतर करावे. स्थलांतर साधने उपलब्ध आहेत. कुचे  स्थान लाखो  वापरकर्त्यांमुळे आहे. त्यांनी ट्विटरच्या निलंबनामागील तर्कावरही प्रश्नचिन्ह उपस्थित  करताना ते म्हणाले की, “ही लोकशाही नाही. शक्ती आणि नियंत्रण वापरण्याची ही  गरज आहे. मस्कला किती नियंत्रण मिळवायचा आहे? अनेक प्रतिथयश लोकांचे ट्विटर अकाउंट निलंबित केले आहे.

हेही वाचा

Back to top button