बिहार: विषारी दारू पिल्याने ६० हून अधिक जणांचा मृत्यू; अनेक गावांवर शोककळा, १२६ जण पोलिसांच्या ताब्यात

poisonous liquor
poisonous liquor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बिहारच्या सारण जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने आत्तापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण मृत्यूशी झुंज देत आहेत. काही जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. छपरा येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेने अनेक गावातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत, चौकशी सुरू केली आहे.

दुसरीकडे, याप्रकरणी संपूर्ण सारण जिल्ह्यात पोलीसांकडून छापे टाकण्यात येत आहेत तसेच याप्रकरणी कसून तपास करण्यात येत आहे. आतापर्यंत दारू व्यवसायाशी संबंधित १२६ जणांना अटक करण्यात आली आहे. चार हजार लिटरहून अधिक अवैध दारूही जप्त करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या मागणीवरून या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

माहिती देण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

मृतांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, दारू प्यायल्यानेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यात ३१ पोलीसांचा समावेश आहे. एवढेच नाही तर मशरक पोलिस स्टेशनचे एसएचओ आणि एका स्थानिक चौकीदाराला याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय मरहौराच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. डीएम आणि एसपींनी स्थानिक लोकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे याबाबत जी काही माहिती असेल, त्यांनी न घाबरता समोर यावे आणि पोलिसांना कळवावे.

विरोधी पक्षाकडून बिहार मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

विषारी दारूमुळे हा मृत्यू झाल्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. मशरक आणि सामावर्ती भागातील डोइला या गावामध्ये मंगळवारी (दि.१४) बारापेक्षा जास्त लोकांची प्रकृती बिघडली. यानंतर २० लोकांचा या मृत्यू झाला आहे. यापूर्वीही विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या घटना बिहारमधून समोर आल्या आहेत. दरम्यान, बिहारमध्ये दारूबंदी असतानाही या घटनेने आत्तापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाल्याने विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. (Poisonous Liquor)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news