Poisonous Liquor : बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने मृतांचा आकडा 39 वर, अजूनही अनेक जण रुग्णालयात भरती

Poisonous Liquor
Poisonous Liquor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारच्या सारण जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढला असून तो 39 वर पोहोचला आहे. अजूनही अनेक जण रुग्णालयात भरती आहेत. तर असे सांगण्यात येत आहे की काही लोक स्थानीय स्तरावर चोरून उपचार घेत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. (Poisonous Liquor)

विषारी दारूमुळे हा मृत्यू झाल्या असल्याचा आरोपी कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. मशरक आणि सामावर्ती भागातील डोइला या गावामध्ये मंगळवारी (दि.१४) बारापेक्षा जास्त लोकांची प्रकृती बिघडली. यानंतर २० लोकांचा या मृत्यू झाला होता. आज हा आकडा आणखी वाढून 30 वर पोहोचला आहे. यापूर्वीही विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या घटना बिहारमधून समोर आल्या आहेत. दरम्यान, बिहारमध्ये दारूबंदी असतानाही इतक्या लोकांचा मृत्यू झाल्याने विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. (Poisonous Liquor)

विषारी दारूविषयी माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सदर रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आले आहे. मृत्यू झालेल्या लोकांनी सोमवारी (दि.१२) रात्री दारू प्राशन केल्याची चर्चा आहे. यानंतर मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Poisonous Liquor)

…आरोपांमुळे नीतीश कुमार भडकले (Poisonous Liquor)

या घटनेवरून बिहार विधानसभेत मोठा हंगामा झाला. विरोधी पक्षाचे नेते विजय कुमार सिन्हा यांनी दारूबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर नीतीशकुमार विरोधकांवर चांगलेच भडकले. त्यांनी यावेळी उत्तेजीत होऊन भाजप सदस्यांना सुनावले की, "त्यांनी देखील दारूबंदीचे समर्थन करून त्याला यशस्वी बनवण्याची शपथ घेतली होती, याची आठवण करून दिली. तसेच आता त्याचे काय झाले, तुम्ही सर्व दारूडे झाला आहात. हे खपवून घेतले जाणा नाही. बिहारमध्ये दारू देवाप्रमाणे झाली आहे. जी दिसत नाही मात्र सगळीकडे अस्तित्वात आहे."

नीतीश कुमार यांच्या विधानसभेतील या व्यवहरावर भाजपने विरोध केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे की नीतीश कुमार यांच्यामुळे दररोज दारूमुळे मृत्यू होत आहे. (Poisonous Liquor)

हे ही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news