Poisonous Liquor : बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने २० जणांचा मृत्यू | पुढारी

Poisonous Liquor : बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने २० जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारच्या सारण जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. छपरा येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. (Poisonous Liquor)

विषारी दारूमुळे हा मृत्यू झाल्या असल्याचा आरोपी कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. मशरक आणि सामावर्ती भागातील डोइला या गावामध्ये मंगळवारी (दि.१४) बारापेक्षा जास्त लोकांची प्रकृती बिघडली. यानंतर २० लोकांचा या मृत्यू झाला आहे. यापूर्वीही विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या घटना बिहारमधून समोर आल्या आहेत. दरम्यान, बिहारमध्ये दारूबंदी असतानाही २० जणांचा मृत्यू झाल्याने विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. (Poisonous Liquor)

विषारी दारूविषयी माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सदर रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आले आहे. मृत्यू झालेल्या लोकांनी सोमवारी (दि.१२) रात्री दारू प्राशन केल्याची चर्चा आहे. यानंतर मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Poisonous Liquor)

हेही वाचंलत का?

Back to top button