

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – गोधरा रेल्वे जळीतकांडातील एका दोषीला सर्वोच्च न्यायालयाकडून गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला. २००२ साली गोधरा येथे साबरमती एक्सप्रेसचा एक डबा जाळण्यात आला होता. त्या घटनेत ५९ लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर गुजरातमध्ये जातीय दंगली भडकल्या होत्या. ( Godhra train burning case )
रेल्वे जळीतकांडातला फारुक नावाच्या दोषीने १७ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालविले आहेत. त्यामुळे त्याला जामीन दिला जावा, अशी विनंती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी घेउन फारुक याला जामीन मंजूर केला. फारुक याच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर काही वर्षांपूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते.
रेल्वे जळीकांडात आरोप शाबित झालेल्या अनेक दोषींनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फारुक हा केवळ दगडफेकीच्या प्रकरणातला गुन्हेगार आहे असे नाही. त्याच्यासह अन्य दोषींनी केलेल्या प्रचंड दगडफेकीमुळे जळत्या डब्यातील लोकांना बाहेर पडता आले नव्हते. दगडफेकीत अनेक लोक जखमीदेखील झाले होते, असा युक्तिवाद गुजरात सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला. मात्र न्यायालयाने फारुकचा जामीनअर्ज मंजूर केला.
हेही वाचा :