Bihar Hooch tragedy : जो दारु पिणार, तो मरणार : नितीशकुमारांची जीभ घसरली

पुढारी ऑनलाईन डेस्क : विषारी दारु पिल्याने ३९ जणांचा मृत्यू झाल्याने बिहारमध्ये खळबळ माजली आहे. या घटनेवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची प्रतिक्रियेमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ( Bihar Hooch tragedy )
Bihar Hooch tragedy : काय म्हणाले नितीशकुमार?
विषारी दारु पिल्याने ३९ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना गुरुवारी ( दि. १५ ) नितीशकुमार म्हणाले की, बिहारमध्ये दारुबंदी आहे. जो दारु पिईल तो मरणारच. आम्ही महात्मा गांधी यांचे विचार आणि बिहारमधील महिलांच्या इच्छेनुसार दारुबंदी लागू केली आहे. आता विरोधी पक्षात बसलेले लोक विषारी दारुच्या प्रश्नावर बोलत आहेत. मला त्यांना एवढच विचारायचे आहे की, तुमचे शासन असणार्या राज्यांमध्ये विषारी दारु पिवून किती लोकांचा मृत्यू झाला आहे. आज तुम्ही विरोधी पक्षात बसला म्हणून यावर बोलत आहात. तुमच्या सहमतीनेच बिहारमध्ये दारुबंदी कायदा लागू झाला आहे, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.
बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने मृतांचा आकडा 39 वर
बिहारच्या सारण जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढला असून तो 39 वर पोहोचला आहे. अजूनही अनेक जण रुग्णालयात भरती आहेत. तर असे सांगण्यात येत आहे की काही लोक स्थानीय स्तरावर चोरून उपचार घेत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. (Poisonous Liquor)
विषारी दारूमुळे हा मृत्यू झाल्या असल्याचा आरोपी कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. मशरक आणि सामावर्ती भागातील डोइला या गावामध्ये मंगळवारी (दि.१४) बारापेक्षा जास्त लोकांची प्रकृती बिघडली. यानंतर २० लोकांचा या मृत्यू झाला होता. आज हा आकडा आणखी वाढून 30 वर पोहोचला आहे. यापूर्वीही विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या घटना बिहारमधून समोर आल्या आहेत. दरम्यान, बिहारमध्ये दारूबंदी असतानाही इतक्या लोकांचा मृत्यू झाल्याने विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. (Poisonous Liquor) विषारी दारूविषयी माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सदर रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आले आहे. मृत्यू झालेल्या लोकांनी सोमवारी (दि.१२) रात्री दारू प्राशन केल्याची चर्चा आहे. यानंतर मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Poisonous Liquor)
If someone consumes liquor, they will die, says Bihar CM Nitish Kumar on Hooch tragedy
Read @ANI Story | https://t.co/HArL8ZYXNn#NitishKumar #BiharHoochTragedy #ChhapraHoochTragedy pic.twitter.com/ddKl9FSLwI
— ANI Digital (@ani_digital) December 15, 2022