नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीत पराभव झाल्याची जबाबदारी स्वीकारत दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे गुप्ता यांनी राजीनामा पाठविला असून, तो मंजूर करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.